रणजितसिंह डिसले ग्लोबल पुरस्कार विजेते
💐 शिक्षक 💐 शिक्षक म्हणजे , चांगले संस्कार करणारी मूर्ती संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती चारित्र्यवान विद्यार्थी घडवणारा शिल्पकार. जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार रणजितसिंह डिसले सर रणजितसिंह डिसले सर हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. रणजितसिंह डीसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयात झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यु आर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले सर प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे;तसेच इतर शिक्षकांनाही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले आहे. आय टी च्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन मध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ...